इनरव्हील क्लब तर्फे ब्रेस्ट कॅन्सर ची लक्षणे, उपचार ,लक्षणे याविषयी जनजागृती
उदगीर (एल.पी.उगीले) : इनरव्हील क्लब उदगीर व मातृभूमी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे व उपचार याविषयी जनजागृती करण्यात आली. ब्रेस्ट कॅन्सरचा सेमिनार घेण्यासाठी उदगीरच्या प्रसिद्ध डॉक्टर प्राजक्ता गुरुडे (Infertility specialist) उपस्थित होत्या. या सेमिनारसाठी मातृभूमी कॉलेजच्या विद्यार्थिनींना डॉक्टर गुरुडे मॅडम यांनी अगदी सोप्या भाषेत त्यांना ब्रेस्ट कॅन्सर ची लक्षणे व उपचार कसे करायचे याविषयी माहिती दिली. ब्रेस्ट कॅन्सरचे विविध स्लाइट्स दाखवून त्यांनी प्रभावीपणे याविषयी माहिती दिली.
या सेमिनारसाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष मीरा चेंबुले, उपाध्यक्ष स्वाती गुरुडे, सचिव शिल्पा बंडे, मातृभूमी कॉलेजच्या प्राचार्य उषा कुलकर्णी उस्तुरे, संपादक पल्लवी मुक्कावार, कोषाध्यक्ष मानसी चन्नावार, तसेच इनरव्हील क्लब चे सदस्य प्रिया नारखेडे, पल्लवी कुलकर्णी, योजना चौधरी, नेहा जैन, तुलसी देशमुख यांची विशेष उपस्थिती होती. मातृभूमी कॉलेजच्या सर्व स्टाफचे व कर्मचाऱ्यांचेही सहभाग होते.