महात्मा फुले स्मृतिदिन व संभाजी ब्रिगेडचा वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

महात्मा फुले स्मृतिदिन व संभाजी ब्रिगेडचा वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

81 बाटल्यांचे रक्त संकलन

अहमदपूर (गोविंद काळे) : मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व सर्व कक्ष अहमदपूर यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन व संभाजी ब्रिगेड वर्धापन दिनानिमित्त 28 नोव्हेंबर 2022 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी एकूण 81 बाटल्यांचे रक्तदान संकलन करण्यात आले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ.पांडूरंग कदम, यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. दत्ताभाऊ गलाले, मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.गोविंदराव शेळके, डॉ.गणेश कदम, डॉ.धीरज देशमुख, डॉ. सतीश पेड, गोविंद गिरी, डॉ.सिद्धार्थकुमार सूर्यवंशी,अशोक चापटे, नाना कदम, आदीची उपस्थिती होती. मराठा सेवा संघ तालुका अहमदपूर शाखेच्या वतीने सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना अनेक उपक्रम राबवण्याचे काम केले जाते. ‘रक्तदान महान दान ‘ याची जाणीव ठेवून आपले रक्त हे एखादया रुग्णाला जीवन देऊ शकते. याची जाणीव ठेवून अलीकडील काळात रक्ताचा भासत असलेला तुटवडा लक्षात घेऊन.

सदरील संघटनेद्वारा दरवर्षी महात्मा फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करता यावे. त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड वर्धापन दिन या निमित्ताने साजरा करता यावा हा दुग्धशर्करा योग साधुन रक्तदान शिबिराचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. रक्तदानाचे हे पाचवे वर्ष असून, सातत्याने शंभर बाटल्या रक्त संकलन करण्याचा संकल्प साधारणपणे पूर्णत्वास नेण्याचा संकल्प असतो. या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 81 बाटल्या रक्त संकलन करण्याचे कार्य झालेले आहे. हे रक्तदान सेवा शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा.दताभाऊ गलाले, प्रा.गोविंदराव शेळके, अशोक चापटे, नाना कदम, जयश्री पवार, विरेंद्र पवार, सौरभ पाटील, सिध्दार्थ दापके,दशरथ जाधव, दता कदम, सुनील पाटील ,श्रीधर तराटे, गणपत जाधव आदी सेवा संघ कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.विलासराव देशमुख वैद्यकीय माहाविदयालय लातूर येथील डॉ.चौधरी एस.एम., डॉ कांचन भोसले व त्यांचे सहकारी यांनी या निमित्ताने सेवा दिली.

About The Author