वकील मंडळाच्या अध्यक्षपदी ॲड. मोहन सिरसाट तर सहसचिवपदी ॲड. सतीश चोथवे
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुका वकील मंडळाच्या कार्यकारणीची निवड दि.10 मार्च रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास माजी अध्यक्ष ॲड. पांडुरंग आदुडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे. या बैठकीत वार्षिक अहवालाचा लेखाजोखा चे वाचन होऊन सर्वानुमते रेणापूर वकील मंडळाचे अध्यक्ष म्हणून ॲड. मोहन गंगाधरराव सिरसाट यांची तर सहसचिवपदी सतिष चोथवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्षपदी ॲड. सिकंदर शेख, सचिव ॲड. श्रीकांत सूर्यवंशी, कोषाध्यक्षपदी ॲड. जे आर केदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर सदस्यपदी ॲड. प्रशांत आकनगिरे, ॲड. तानाजी कणसे, ॲड. मुरलीधर पडोळे, ॲड. दशरथ सरवदे, ॲड. सुरेंद्र मोटेगावकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवड प्रकियेवेळी तालुक्यातील सर्व ज्येष्ठ विधिज्ञ उपस्थित होते. तसेच यावेळी रेणापूर वकील मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला आहे.