जेईई मेन्स परीक्षेत दयानंद विज्ञान महाविद्यालयाची यशस्वी भरारी
लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय पातळीवर आयटी क्षेत्राच्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी झालेल्या जेईई मेन्स परीक्षेचा निकाल दि.8 मार्च रोजी लागला आहे. या परीक्षेत दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवण्याची परंपरा कायम ठेवत यश संपादन केले आहे.
दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या अर्जुन जमादार या विद्यार्थ्यांनी 96.3994 पर्सेंटाइल मार्क मिळून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक तसेच श्रीराम अशोक बिराजदार विद्यार्थ्यांने96. 06 पर्सेंटाइल मार्क, कोकळे निखिल बाळासाहेब याने 94.7062 पर्सेंटाइल मार्क सह तृतीय व अनुराग कदम या विद्यार्थ्यांने 93.2170 पर्सेंटाइल मार्क सह चतुर्थ येण्याचा मान मिळवला आहे. या निकालामध्ये महाविद्यालयाचे 12 विद्यार्थी 90 पर्सेंटाइल च्या पुढे आहेत तर 80 पर्सेंटाइल च्या पुढे 30 विद्यार्थी आहेत. या वर्षापासून जेईई मेन्स परीक्षा वर्षातून चार वेळेस घेतली जात आहे. यापैकी हा निकाल पहिल्या परीक्षेचा लागला आहे. विद्यार्थ्यांना आणखी तीन वेळेस ही परीक्षा देण्याची संधी आहे. या चारही परीक्षेत सर्वात जास्त मार्क ज्या परिक्षेत मिळतील ते मार्क हे प्रवेशासाठी गृहीत धरले जाणार आहेत.
या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अरविंद सोनवणे, सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन, सीईटी चेअरमन डॉ.चेतन सारडा, कोषाध्यक्ष संजय बोरा, प्राचार्य जे एस दरगड, उपप्राचार्य डॉ. डी. टी. जगताप, पर्यवेक्षक प्रा. एम ए. माने, आणि प्रा. वरुडकर प्रा. रवि कुमार, श्री कोराळे व इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.