लातूर जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीच्या सदस्यपदी माजी सरपंच संगमेश्वर जनगावे
लातूर (प्रतिनिधी) : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार व नेहरू युवा केंद्र संगठन मुख्यालय नवी दिल्ली मार्फत निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून चाकूर तालुक्यातील खुर्दळी चे माजी सरपंच संगमेश्वर माधवराव जनगावे यांची लातूर जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. लातूर जिल्हयात युवा विकासाच्या क्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करने व युवा चळवळीला चालना देणे, या उद्देशाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली.
माजी सरपंच संगमेश्वर जनगावे यांनी झारखंड, तामिळनाडू, कर्नाटक, पुद्दुचेरी, नागालँड, उत्तर प्रदेश, गोवा, महाराष्ट्रातील पुणे, अंबोली, कोल्हापूर, सातारा, पाचगणी, वाई येथे भारत सरकारच्या वतीने आयोजित राष्ट्रीय एकता शिबिरात राज्याच्या संघाचे संघ प्रमुख म्हणून नेतृत्व करत उल्लेखनीय कामगिरी केली. यासोबतच चीन मध्ये आयोजित शंभर देशातील युवक युवतींच्या चमूमध्ये भारत देशाकडून एकमेव संगमेश्वर जनगावे यांची जागतिक शांतता परिषदेसाठी निवड करण्यात आली होती. सामाजिक कार्याबद्दल भारत सरकारचा युवा पुरस्कार तर पत्रकारितेतील कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रोटरी क्लब च्या वतीने श्रीलंका येथे आयोजित झेप कॉन्फरन्स मध्ये ते सहभागी झाले होते. इंडियन तायकन्दो कराटे किक बॉक्सिंग स्पर्धा व विद्यापीठाच्या युवक महोस्तवात परिक्षक म्हणून कामगिरी केली आहे. विविध माध्यमातून केलेल्या कार्यांची दखल घेऊन संगमेश्वर जनगावे यांची या समितीच्या सदस्यपदी जिल्हाधिकाऱ्यांनी निवड केली आहे. या निवडीबद्दल आमदार बाबासाहेब पाटील, तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नरसिह घोणे, जिल्हा युवा समन्वयक साक्षी समैया, लेखाधिकारी संजय ममदापुरे यांच्यासह सर्वच स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.