प्रेमळ व संत साहित्याचे अभ्यासक हारवले – अजितसिंह पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : रेणापूर येथील शिवाजी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.दिलीप दादाराव माने यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य ते आजपर्यंतचा त्यांचा प्रवास प्र्रेरणादायी ठरला आहे. त्यांचे महाविद्यालयातील प्राध्यापकी जीवन ते कौंटुबिक प्रवास आनंददायी असताना अचानक जानेवारी महिन्यात पत्नीचे निधन झाले व नंतर त्यांचे निधन झाले. हा माने कुटूंबियासाठी मोठा आघात आहे. अतिशय शांत, संयमी, प्रामाणिक आणि सांप्रदायिक कुटूंबियातून आलेले माने सर अचानक गेल्यामुळे जेएसपीएमचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे माने सरांच्या रूपाने असणारे प्रेमळ व संत साहित्याचे अभ्यासक हारवले असल्याची खंत भाजपा युवा नेते तथा जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केली.
यावेळी ते रेणापूर येथील शिवाजी महाविद्यालयात प्रा.डॉ.दिलीप दादाराव माने यांच्या अकाली निधनामुळे आयोजित शोकसभेत बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ.आर.एस.अवस्थी, उपप्राचार्य डॉ. सुरेश नांदे, उपप्राचार्य प्रा.मारूती सुर्यवंशी, डॉ.सतीश यादव आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ. अरूण हांगे, डॉ.सुरेश नांदे, डॉ. सतीश यादव, डॉ. जयद्रथ जाधव, डॉ.शाम लेवंडे,उपप्राचार्य प्रा.मारूती सुर्यवंशी यांनी प्रा.डॉ. माने यांना शब्दातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी या शोकसभेचे प्रास्ताविक डॉ. चंद्रकांत शेरखाने यांनी केले. प्रारंभी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून व सँनिटायझरचा वापर करून प्रा.माने सरांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी शिवाजी महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.