पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रीय सेवा योजना विभाग,पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय,उदगीर व कै. नागप्पा अंबरखाने ब्लड बँक,उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर मध्ये पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय,प्रक्षेत्र,विद्यापीठ उपकेंद्र,आस्थापनेतील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी व रासेयो स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे अध्यक्ष डॉ. रावजी मुगळे (सहयोगी अधिष्ठाता),पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर तसेच डॉ.गोपाल भारकड(प्राध्यापक-परोपजीवी शास्त्र),डॉ. प्रशांत मसारे(प्राध्यापक-औषधी शास्त्र),डॉ.अशोक भोसले (प्राध्यापक-सूक्ष्म जीव शास्त्र ),डॉ.अनिल पाटील(प्राध्यापक-प्रसुतीविज्ञान शास्त्र), डॉ.संभाजी चव्हाण(राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी),डॉ. रवींद्र जाधव(प्राध्यापक-औषधी शास्त्र),डॉ.आनंद मोहन(प्राध्यापक-औषधी शास्त्र) उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरामध्ये कु.अपूर्वा गोपाळराव शेंडे,कु.किरण कल्याणराव येरनाळे,कु.तोषाली संजीव कुमार,कु.उत्कर्षा अभिजित काळे,बोराडे कार्तिक संजय, खंभाळकर प्रथमेश विश्वनाथराव, संदेश बाळासाहेब नेटके,हिमांशू ललितकुमार अवस्थी,होळगे परमेश्वर संजय,मनिषकुमार महेंद्रसिंग,दिनेश कुमार,रवींद्र काका जाधव,आनंद मोहन प्रसाद,शुभम सिंघ,लक्ष्मीकांत प्रमोद पत्तेवार यांनी रक्तदान केले.
या शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग,पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय,उदगीर यांनी केले होते. या वेळी डॉ. रावजी मुगळे सर (सहयोगी अधिष्ठाता) यांनी विद्यापीठ दिवस निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.विद्यार्थी अवस्थेत रक्तदान केल्यामुळे देण्याची भावना पुढील आयुष्यात जपण्याचे आवाहन केले. तसेच नागप्पा अंबरखाने ब्लड सेंटर उदगीर च्या वतीने पी आर ओ ओमकार गांजुरे यांनी रक्तदान कार्याचे फायदे व तरुणांचा रक्तदान चळवळीतील सहभाग, याविषयी सखोल मार्गदर्शन करत रक्तदात्यांचे व शिबिर आयोजकांचे आभार मानले.
