अचानक दृष्टी गेलेल्या अमोलला मातृभूमीच्या सतीश उस्तुरे यांची अनमोल मदत, अंधासाठीच्या सॉफ्टवेअर मुळे मिळाली पदवी!

अचानक दृष्टी गेलेल्या अमोलला मातृभूमीच्या सतीश उस्तुरे यांची अनमोल मदत, अंधासाठीच्या सॉफ्टवेअर मुळे मिळाली पदवी!

उदगीर (एल.पी.उगीले) : दोन्ही डोळ्या मागील रक्त वाहिन्यांची वाढ खुंटून रक्त पुरवठा बंद पडल्यामुळे  दोन्ही डोळ्याने अकाली अंधत्व आलेल्या अमोल महाके यास पदवीचे शिक्षण घेता येत नव्हते, अशा वेळी काय करावे ? हे त्याला समजत नव्हते . अनेकांना या बाबत विचारीत असताना त्याची भेट उदगीर येथे मागील २२ वर्षापासून संगणकाचे ज्ञान देणारी पहिली संस्था स्थापन केलेले सतीश उस्तुरे यांची भेट झाली. यावेळी खास अंध दिव्यांगासाठी बनविण्यात आलेल्या  सॉफ्टवेअर बाबत माहिती देवून त्याच्या खरेदीसाठी मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. सतीश उस्तुरे यांनी आर्थिक मदत केली होती. अमोल महाके यांनी या डेस्कटॉप डिव्हाईस या सॉफ्टवेअरच्या  मदतीने  बी ए ची पदवी प्राप्त करत ७०% टक्के गुण घेऊन पास झाला. आपले गुणपत्रक घेऊन अमोल यांनी सतीश उस्तुरे यांची भेट घेत पदव्युत्तरचे शिक्षण घेणार असल्याची ईच्छा बोलावून दाखवली. अमोल महाके यास  पुढील शिक्षनासोबतच सॉफ्टवेअरसाठी लागणारी आर्थिक मदत   सतिश उस्तुरे यांनी  पुन्हा केली . त्यामुळे  या विद्यार्थ्याचे पदव्युत्तर शिक्षण सुद्धा पूर्ण होणार होणार आहे.

अचानक दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेल्या नंतर घाबरून न जाता आपले शिक्षण घेण्यासाठी दुसरा काही मार्ग आहे का? याचा शोध घेत असताना सतीश उस्तुरे यांची अमोल याने भेट घेतली . अंधत्व आल्यामुळे शिक्षण थांबवू नये, संगणकाच्या मदतीने पुढील शिक्षण घेता येवू शकते. असा धीर देवून अंध दिव्यांगासाठी असलेल्या सॉफ्टवेअर बाबत संपूर्ण माहिती दिली. आधुनिक सॉफ्टवेअर खरेदी करण्यासाठी लागणारी आर्थिक मदत केल्यामुळे या सॉफ्टवेअरच्या मदतीने जिद्दीने अमोलने पदवी प्राप्त केली.आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करीत पदवी प्राप्त केल्यामुळे अमोल महाके याचा सत्कार करण्यात आला . यावेळी सतीश  उस्तुरे, प्रा. बिभीषण  मद्देवाड ,सिद्धार्थ सूर्यवंशी, प्रा. उस्ताद सय्यद, प्रा. रणजीत मोरे ,ग्रंथपाल उषा सताळकर, कार्यालयीन कर्मचारी  नंदकिशोर बयास यांच्या सह कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

गरजूंना मदत हा मानवधर्म…….

ग्रामीण भागातील दिव्यांग विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती नसते, यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहत आहेत.या सॉफ्टवेअर आणि ऑडियो बुक मुळे अभ्यासक्रम सहज समजतो.शिक्षण अपूर्ण राहू नये. यासाठी जनजागृती आणि शासकीय मदतीची अशा दिव्यांग विद्यार्थ्याना गरज आहे. शासकीय पातळीवर होणारा निर्णय होईल मात्र गरजू आणि शिक्षणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या हातबल झालेल्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे हाच खरा मानव धर्म आहे .
सतीश उस्तूरे
(अध्यक्ष मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक  मंडळ उदगीर)

सतीश  उस्तुरे माझ्यासाठी देवच !

मातृभूमी महाविद्यालयाचे प्रमुख सतीश उस्तुरे सर यांनी मला शिक्षणाची कोरडी प्रेरणाच नाही तर शिक्षणासाठी अर्थसाह्य आणि माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून मला सहकार्य केले. त्यांनी माझ्यावर  विश्वास दाखवत  दिव्यांगासाठी  लागणाऱ्या सॉफ्टवेअरसाठी  आर्थिक मदत केली. त्यामुळे माझे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले, पुढील शिक्षणासाठी त्यांनी माझ्यावर विश्वास टाकत यशोफ्टवेअर साठी मदत केली आहे. त्यांचा विश्वासाला सार्थ ठरवेन तसेच जीवनात त्यांच्या या सहकार्यामुळे स्वतःच्या पायावर निश्चितच उभा राहीन.

अमोल महाके ( गरजू विद्यार्थी.)

About The Author

error: Content is protected !!