हावगीस्वामीच्या इंग्रजी विभागातील विद्यार्थ्यांनी घेतली ग्रंथालय व ग्रंथांची माहिती

हावगीस्वामीच्या इंग्रजी विभागातील विद्यार्थ्यांनी घेतली ग्रंथालय व ग्रंथांची माहिती

उदगीर (एल.पी.उगीले) : श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील विद्यार्थ्यांनी लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयातील ग्रंथालयात जाऊन इंग्रजी ग्रंथांची माहिती घेतली. यावेळी या उपक्रमाच्या संयोजिका प्रा.जे.डी.संपाळे उपस्थित होत्या.

दयानंद कला महाविद्यालयाचे ग्रंथालय अतिशय सुसज्ज व समृद्ध आहे. संपूर्ण ग्रंथालय संगणीकृत असून मराठवाड्यातील एक जुने व महत्त्वाचे ग्रंथालय म्हणून याकडे पाहिले जाते. येथील इंग्रजीतील ग्रंथ संदर्भ मूल्य स्वरूपाचे आहेत. इंग्रजीतील जुने ग्रंथ, नियतकालिके कोश व लेखकांचे साहित्य इत्यादींची माहिती ग्रंथालय सहायक श्री जोशी यांनी विद्यार्थ्यांना दिली.

आजच्या काळात म्हणजेच तंत्रयुगात ग्रंथ व वाचनसंस्कृती लोप पावत आहे. ग्रंथ हेच खऱ्या अर्थाने गुरू असतात. विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीचे महत्त्व कळावे आणि ग्रंथाविषयी त्यांच्या मनात आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी ग्रंथालयाच्या वतीने दयानंद कला महाविद्यालयाचा वेध हा वार्षिक विशेषांक सर्वांना भेट म्हणून देण्यात आला.

सदरील ग्रंथ अभ्यास भेट महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एस. एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.ए.ए. काळगापुरे, इंग्रजी विभागप्रमुख डॉ.व्ही.जी.गोरे व मुख्य संयोजिका प्रा.जे.डी.संपाळे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आली होती. यासाठी इंग्रजी विभागातील प्रा. प्रसाद घाळे व प्रा. ज्योती पाटील यांचेही सहकार्य लाभले. यावेळी इंग्रजी विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!