तिरुपतीसाठी आता लातूरहून नवीन रेल्वे, उदगीर-लातूरहून मुंबईसाठीही दुसरी रेल्वेगाडी

तिरुपतीसाठी आता लातूरहून नवीन रेल्वे, उदगीर-लातूरहून मुंबईसाठीही दुसरी रेल्वेगाडी

लातूर (एल.पी.उगीले) : लातुर जिल्ह्यातील भक्तांसाठी तिरुपती बालाजी देवस्थानकडे जाणाऱ्या भाविकांसाठी आता लातूर मार्गे नवीन साप्ताहिक रेल्वेगाडी सोडण्यात येत आहे , लातूरहून तिरुपतीसाठी रेल्वेगाडी सोडण्यात यावी, अशी गेल्या अनेक वर्षांपासून लातूरकरांची मागणी होती . या मागणीला लक्षात घेऊन खा.शृंगारे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्यासह रेल्वे प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करीत पाठपुरावा केला होता , आता या पाठपुराव्याला यश मिळताना दिसत आहे . लातूर लोकसभा मतदार संघातील प्रवाश्यांची सोय व्हावी. या दृष्टीने हि रेल्वेगाडी खासदार सुधाकर शृंगारे यांनी लातूर ,लातूररोड,उदगीर मार्गे सुरुवात करण्याची मागणी केली होती . त्या मागणीनुसार हि तिरुपती रेल्वेगाडी धावणार आहे . उदगीर आणि लातूरहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाश्यांसाठी नवीन साप्ताहिक रेल्वेगाडीही सोडण्यात येत आहे . सोलापूर-कलबुर्गी-बिदर-उदगीर-लातूर, पुणे मार्गे हि गाडी कुर्ला म्हणजेच लोकमान्य टिळक टर्मिनन्सला पोहचेल.या दोन्ही गाड्या सुरु केल्या बद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव , केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, यांनी लातूरकरांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.

याबाबत मध्यरेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शामसुंदर मानधना यांनी दिलेली माहिती अशी कि , १५ डिसेंबर ते १७ फेब्रुवारी दरम्यान सोलापूर-लातूर-उदगीर-बिदर-कलबुर्गी मार्गे तिरुपती हि साप्ताहिक विशेष रेल्वगाडी सुरुवात करण्यात आली आहे . लातूरवरून तिरुपतीसाठी रेल्वेगाडी सोडण्यात यावी. अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची लातूरकरांची मागणी होती , या मागणीला लक्षात घेऊन खा. शृंगारे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव , रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्यासह प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करीत पाठपुरावा केला होता . याशिवाय रेल्वे विभागाच्या बैठकांमध्ये खासदार यांनी वेळोवेळी तिरुपती आणि पुणे,मुंबई गाड्यांची मागणी केली होती.

लातूर जिल्ह्यासह लोहा,कंधार, मुखेड या भागातून तिरुपती बालाजी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी मोठी आहे , हि गाडी सुरुवात करण्यात आल्याने भाविकांना सोयीचे होणार आहे , जास्तीत जास्त भाविकांनी या गाडीने प्रवास करावा. म्हणजे प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आलेल्या या गाडीच्या फेऱ्या वाढतील . या दोन्ही रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरुवात करण्यात आले आहे . त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी प्रतिसाद दिल्यास या रेल्वे गाड्या नियमित करण्यास पाठपुरावा करता येईल.

सोलापूर-लातूर-बिदर-कलबुर्गी-तिरुपती या रेल्वेगाडीचा क्रमांक-०१४३७ असून गुरुवारी हि रेल्वेगाडी सोलापूर येथून दर गुरुवारी रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि लातूर स्टेशनवर हि गाडी शुक्रवारी पहाटे २ वा. येऊन २. ५५ ला उदगीरकडे मार्गस्थ होईल.

सोलापूर ,कुर्डुवाडी ,बार्शी ,उस्मानाबाद ,लातूर ,लातूररोड ,उदगीर ,भालकी ,बिदर ,हुमनाबाद ,कलबुर्गी ,वाडी मार्गे तिरुपतीला शुक्रवारीच रात्री ७ वाजून ४५ मिनिटांनी पोहचेल . परतीच्या प्रवासात त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री ९ वाजून १० मिनिटांनी तिरुपतीहून लातूर मार्गे ,सोलापूरकडे निघेल . परतीच्या प्रवासात या गाडीचा क्रमांक -०१४३८ असेल.

सोलापूरहून अक्कलकोट,गाणगापूर, कलबुर्गी ,बिदर, लातूर, पुणे मार्गे मुंबईसाठी लोकमान्य टिळक टर्मिनन्स कुर्ला साठी साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी १३ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी पर्यंत प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आली आहे . या गाडीचे आरक्षण देखील सुरुवात करण्यात आले आहे . सोलापूरहून हि गाडी दर मंगळवारी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटेल . तर लातूरला सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी येऊन ५ वाजून ३५ मिनिटांनी मार्गस्थ होईल . या गाडीचा क्रमांक ०१४३५ असा असेल तर परतीच्या प्रवासात या गाडीचा क्रमांक ०१४३६ असेल बुधवारी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनल येथून हि गाडी निघेल ,तर पुणे येथे दुपारी ४ वाजून ५० मिनिटांनी येऊन ४ वाजून ५५ मिनिटांनी लातूरकडे मार्गस्थ होईल . सदर गाडी लातूर स्थानकावर त्याच दिवशी ११ वाजून ४० मिनिटांनी येऊन ११.४५ वाजता बिदर ,सोलापूरकडे मार्गस्त होईल. या गाडीमुळे गाणगापूर आणि अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांची सोय झाली आहे . जास्तीत जास्त प्रवाश्यानी या गाड्यांचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

About The Author

error: Content is protected !!