यशवंत विद्यालयात एन सी सी च्या वतीने स्वच्छता अभियान संपन्न

यशवंत विद्यालयात एन सी सी च्या वतीने स्वच्छता अभियान संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना मुलींच्या ग्रुपच्या वतीने शालेय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन प्राचार्य व्ही व्ही गंपले यांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून करण्यात आले. यावेळी एन सी सी च्या मुलींना बोलताना ते म्हणाले की, संत गाडगेबाबा महाराजा प्रमाणे स्वच्छता ठेवावी असे सांगितले. यावेळी एन सी सी च्या मुलींनी शालेय परिसर, गणेश मंदिराच्या समोरील रस्ता आणि शेजारच्या प्रमुख रस्त्याची स्वच्छता केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन सी सी महिला ऑफिसर मधुबाला आंधळे यांनी सूत्रसंचलन राम तत्तापुरे यांनी तर आभार महादेव खळुरे यांनी मानले. या स्वच्छता अभियानात पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे, सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व एन सी सीच्या मुलींची उपस्थिती होती. स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी एन सी सी च्या मुलींनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!