तालुकास्तरीय मैदानी 400 मीटर धावणे स्पर्धेत संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे घवघवीत यश

तालुकास्तरीय मैदानी 400 मीटर धावणे स्पर्धेत संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे घवघवीत यश

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी वेदांत भगवान कोनापुरे तालुकास्तरीय 400 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम आला आहे. स्वामी विवेकानंद विद्यालय शिरूर ताजबंद येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये शाळेचा विद्यार्थी वेदांत भगवान कोनापुरेची जिल्हास्तरीय मैदानी 400 मीटर धावणे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्याच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष मा.गणेश दादा हाके पाटील ,संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक उद्धव शृंगारे यांनी अभिनंदन व कौतुक केले. या विद्यार्थ्याला क्रीडा शिक्षक नंदकुमार मद्देवाड व बब्रुवान यांनी त्याची तयारी करून घेतली. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!