किलबिल चे तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत यश
अहमदपूर (गोविंद काळे) : शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद विद्यालय येथे दि 29-11-2022 रोजी शालेय तालुका स्तरीय मैदानी स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यामध्ये किलबिल नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पुढील विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
14 वर्षाखालील वयोगटात 400 मी रिले यात ढगे सुमित, हांडे हणमंत, गव्हाळे संकेत, मद्रेवार समर्थ प्रथम तर 100 मीटर धावणे यात ढगे सुमित प्रथम आला. गोळा फेक, हर्डल्स, उंच उडी ,लांब उडी यात वाघमारे श्रेयस व हांडे हणमंत तर 17 वर्षाखालील वयोगटात आयान शेख थाळी फेक मध्ये प्रथम तर भोसले अभय द्वितीय आला. लांब उडीमध्ये काटे शंभूराजे प्रथम, 400 मी धावणे यामध्ये निखिल जायभाये हा द्वितीय, तरी वरील सर्व खेळाडूंचे व क्रीडा शिक्षक विशाल सरवदे, इरफान अकोले अभिजित, मधुकर दासरे, शुभम गुंजरगे यांचे संस्थेचे सचिव आदरणीय ज्ञानोबा भोसले व मुख्याध्यापक संतोष पाटील ,पर्यवेक्षक महावीर गोडभरले व शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
