भुसणी ग्रूप ग्रामपंचायत मध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता

भुसणी ग्रूप ग्रामपंचायत मध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता

उमरगा/मूरूम (नितीन मंमाळे) : उमरगा तालुक्यातील भुसणी ग्रामपंचायत निवडणुक जाहीर झाल्यापासून सर्व इच्छुक उमेदवारांचा जनसंपर्क वाढलेला दिसत आहे. आता थेट जनतेमधील सरपंच पदाचे निवडणुक होत असल्या कारणाने निवडणुक अत्यंत चुरशीची होणार असे दिसून येत आहे, तसेच ग्रुप ग्रामपंचायत असल्याने भूसणी व भूसणीवाडी गावात शिंदे गट, ठाकरे गट व कॉंग्रेस पक्षातील युवा वर्गाचा जोश आपल्याला दिसून येत आहे. युवक वर्गाचा या ग्रामपंचायत निवडणुकीत रस दाखवत असल्याने निवडणुक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. या निवडणुकीत कोणाकोणाचे पॅनल रिंगणात उतरणार व उमेदवार कोण असणार याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे .

About The Author

error: Content is protected !!