आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत कै.रसिका महाविद्यालयाचा संघ अजिंक्य

आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत कै.रसिका महाविद्यालयाचा संघ अजिंक्य

उदगीर (एल.पी.उगीले) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने ब झोन आंतर महाविद्यालयीन पुरुष क्रिकेट स्पर्धा दिनांक 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2019 रोजी उदगीर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत देवणी येथील रसिका महाविद्यालयाने अंतिम फेरीमध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा 4 विकेटने पराभव करून अजिंक्यपद पटकावले. या संघात नविद कुरेशी (कॅप्टन), अंकित जाधव, विशाल जाधव, आफताब शेख ,ज्ञानेश्वर रावळे, शिंदे विक्रम, पवार यादव ,चाफे तानाजी, कुलदीप तेलंगे, बुद्धभूषण सोनकांबळे ,चनाळे पवन, आकाश घाडगे, सूर्यवंशी संतोष, मणियार तह, धबाले आकाश यांचा समावेश होता. या सर्व खेळाडूंना क्रीडा संचालक डॉ सचिन चामले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल सर्व संघातील खेळाडूंचा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे अध्यक्ष बसवराज पाटील व संस्थेचे कोषाध्यक्ष महादेव नौबदे यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले.

या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक डॉ सचिन चामले यांचे संस्थेचे अध्यक्ष गोविंदरावजी भोपणीकर , संस्थासचिव गजाननजी भोपणीकर , प्रभारी प्राचार्य डॉ. प्रशांत भंडे, यांच्या सह शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!