मातृभूमी महाविद्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

मातृभूमी महाविद्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित मातृभूमी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मातृभूमी महाविद्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले . यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान प्रतीचे पूजन तसेच संविधान उद्देशिकाचे सामूहिक वाचन करून ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्या उषा कुलकर्णी,, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. बिभिषण मद्देवाड , प्रा. उस्ताद सय्यद , प्रा. रणजित मोरे , प्रा. रुपाली कुलकर्णी ,प्रा.धोंडीबा जोशी , ग्रंथपाल उषा सताळकर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!