आंतर विभागीय फुटबॉल स्पर्धेत मातृभूमीला अजिंक्यपद
उदगीर (एल. पी. उगिले) : नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत संपन्न झालेल्या क्रीडा स्पर्धेत उदगीर येथील मातृभूमी महाविद्यालयाने आपले वर्चस्व प्रस्थापित करत विविध खेळ प्रकारात प्राविण्य मिळवले आहे.
आंतर विभागीय फुटबॉल स्पर्धेत ब विभागात प्रथम क्रमांक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सदरील फुटबॉलच्या स्पर्धा या आदर्श महाविद्यालय हिंगोली येथे संपन्न झाल्या. या स्पर्धात यश मिळवण्यासाठी फुटबॉल खेळाडू प्राधान्याने प्रवीण राठोड आणि मुंडे यांनी उल्लेखनीय काम करून महाविद्यालयाचे नावलौकिक केले आहे.
महाविद्यालयाने मिळवलेल्या या उज्वल यशाबद्दल आणि विद्यापीठात आपल्या वर्चस्वाचा शिक्कामोर्तब केल्याबद्दल मातृभूमी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उस्तूरे, प्राचार्य उषा कुलकर्णी, प्रा. बिभीशन मद्येवाड, प्रा. उस्ताद सय्यद, प्रा. रणजीत मोरे, ग्रंथपाल उषा साताळकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनीही यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
