प्रोफेसर डॉ. नरसिंग कदम यांना संत नामदेव राष्ट्रीय काव्य पुरस्कार प्रदान

प्रोफेसर डॉ. नरसिंग कदम यांना संत नामदेव राष्ट्रीय काव्य पुरस्कार प्रदान

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. कदम नरसिंग यांना समृद्धी प्रकाशन संस्थेच्या वतीने दिला जाणारा संत नामदेव राष्ट्रीय काव्य साहित्य पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.

त्यांनी साहित्यिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल व त्यांच्या गोंडर या कवितासंग्रहाच्या उत्कृष्ट निर्मिती बद्दल राष्ट्रीय पातळीवरील संत नामदेव काव्य साहित्य पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. नरसिंग कदम यांनी आतापर्यंत अनेक पुस्तकांचे लेखन केलेले आहे. यापूर्वी कदम यांना साहित्य क्षेत्रातील केलेल्या कार्याबद्दल व सामाजिक क्षेत्रातील केलेल्या कार्याबद्दल अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. सुप्रसिद्ध असा संत नामदेव राष्ट्रीय काव्य साहित्य पुरस्कार 2022 त्यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील ,सचिव ज्ञानदेव झोडगे ,उपाध्यक्ष अशोकराव पाटील ,सर्व कार्यकारणी सदस्य शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक जाधव महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व पत्रकार बांधव ,आप्तेष्ट व मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!