जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बाळासाहेब पाटोदे यांच्यावतीने अन्नदान
उदगीर (एल.पी.उगीले) : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गोडधोड अन्नपदार्थ म्हणून खाऊ घातले त्यामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांनी दिवाळी साजरी करण्यात केली केली, आणि आनंद उत्सव साजरा केला.
श्री पांडुरंग निवासी मूकबधिर विद्यालय निडेबन या शाळेमध्ये जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला, तो म्हणजे युवा नेते बाळासाहेब पटोदे व सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील मानकीकर यांच्या कल्पनेतून मूकबधिर व मतिमंद मुले काय असतात? ते कसे राहतात कसे शिकतात? या मुलांमध्ये आल्यानंतरच कळते, असे त्यांना वाटते. त्यांनी मूकबधिर विद्यार्थ्यांना निष्ठअन्नाचे जेवण दिले. पालक व समाज यांच्याकडे उपेक्षित नजरेने पाहतात. त्याच मुलांमध्ये मिसळून त्यांना प्रेमाने, जिव्हाळा दाखवत बाळासाहेब पाटोदे आणि मित्र मंडळाने दिव्यांगाच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. हे मुले शाळेत शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप अमुलाग्र बदल होतो व ते सर्वसामान्याप्रमाणे त्यांना जगण्याची नवी उमेद येते.
पालकांनी व समाजातील सर्व घटकांनी त्यांच्या व्यंगाकडे न बघता त्यांच्यातील कलागुणांना वाव द्यायला हवा. असे विचार भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पटोदे म्हणाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील मानकीकर, अंकुश ताटपले यांच्यासह विविध क्षेत्रातील कार्य करणारे कार्यकर्ते उपस्थित होते. सतीश पाटील मनकिकर यांनी दीव्यांग विद्यार्थ्यांकरिता काही अडचण असल्यास आम्ही सर्व सामजिक कार्यकर्ते सोडवण्याचा मूकबधिर विद्यार्थ्यांना शब्द दिला. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त श्री पांडुरंग निवासी मूकबधिर विद्यालयातील सोयी, सुविधा व उपलब्ध साहित्यांची माहिती यावेळी सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी घेतली. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सोबत बाळासाहेब पाटोदे मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काही वेळ घालवला आणि त्यांना काही अडचणी आल्यास त्या स्पष्ट सांगा मी सोडून दिले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
