विमा कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकाला नामदेवराव कदम यांचे निवेदन
उदगीर (एल.पी.उगीले) : यावर्षी खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, शेतकऱ्यांची पीकच नाही तर चक्क जमिनी देखील खरवडून गेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास आसमानी संकटाने जणू हिरावून घेतला. पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले या झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात विमा मिळाला नाही, काही शेतकऱ्यांना विमा मिळाला तर काही शेतकऱ्यांना मिळालाच नाही, शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन एग्रीकल्चर इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया न्यू दिल्ली येथील अध्यक्षासह व्यवस्थापकीय संचालक श्रीमती गिरीजा सुब्रमण्यम यांना नामदेवराव कदम मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव कदम यांनी भेट घेऊन निवेदन दिले.
लातूर जिल्ह्यात 90% च्या वर नुकसान झाले असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या प्रमाणात विमा मिळावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते, तळागाळातील लोकांच्या अडीअडचणींना धावून जाणारे आरोग्यदूत नामदेव कदम यांनी दिल्ली येथे जाऊन विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत समवेत चर्चा केली, झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळावे अशी आग्रही मागणी केली तेव्हा लवकरच जास्तीत जास्त प्रमाणात विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे आश्वासन सह व्यवस्थापकीय संचालकांनी कदम यांना दिल्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी नामदेव कदम यांच्या आभार मानले आहेत.यावेळी त्यांच्या समवेत संभाजी बेळकोने, दत्ता वाकुडे, सत्यवान पांडे यांच्यासह मित्र मंडळाचे अनेक कार्यकर्ते यांची यावेळी उपस्थिती होती.
