जागतिक अपंग दिनानिमित्त प्रभात फेरी संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारे संचलित लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात जागतिक अपंग दिनानिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली.
सर्व विद्यार्थी व सामान्य जनतेत, अपंग व्यक्तींबाबत जनजागृती निर्माण व्हावी. हा या प्रभातफेरी मागील उद्देश होता.विविध सुवचने लिहिलेले फलक हातात घेवून तसेच ‘दिव्यांगाचा सन्मान, हाच आमचा अभिमान’,’ “समाजाला जागवू या, दिव्यांगाना सक्षम बनवू या” अशा घोषणा देत प्रभात फेरी संपन्न झाली.
या प्रभातफेरीत विद्यार्थ्यांसोबत स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार,शालेय समिती माध्यमिकचे अध्यक्ष सतनप्पा हूरदळे, शालेय समिती प्राथमिकचे अध्यक्ष व्यंकटराव गुरमे,शिवनेरी महाविद्यालय शिरूर अनंतपाळचे प्राध्यापक प्रदीप पत्की, पत्रकार राम मोतीपवळे,सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक रामदास नारंगवाडे,मुख्याध्यापक बाबुराव आडे, उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड,पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर, लालासाहेब गुळभिले, माधव मठवाले, अर्थ समिती शिक्षक प्रतिनिधी नीता मोरे, अभ्यास पूरक मंडळ प्रमुख विनायक इंगळे,अनिता मुळखेडे, प्रशांत चव्हाण,निलेश मांडवकर, सुनील पुलकुर्ते, श्रीपाद सन्मुखे हे उपस्थित होते. स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासुने यांनी या साठी शुभेच्छा दिल्या.
