लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत गीता जयंती उत्साहात साजरी.

लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत गीता जयंती उत्साहात साजरी.

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत संस्थेने सुचवलेला उपक्रम ‘गीता जयंती’ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे,तर प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रचकोर कारखाने गुरुजी, चिन्मय मिशनच्या सदस्या सौ.सुरेखाताई भेंडे,सौ.मालतीताई कुलकर्णी,तसेच भा.शि.प्र. संस्थेच्या स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर वट्टमवार यांची विशेष उपस्थिती होती, तसेच संस्कार केंद्रप्रमुख अंकुश मिरगुडे,विभाग प्रमुख सुधाकर पोलावार, सुरेखा कुलकर्णी, इयत्ता तिसरी वर्गातील कु.आरोही रोट्टे व श्रेया भुरे या श्रीकृष्ण व अर्जुनाच्या वेशभूषेत उपस्थित होत्या.

व्यासपीठावरील मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.प्रमुख मान्यवर पाहुण्यांचे शाळेच्या वतीने भगवद्गीता ग्रंथ व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर सर्व पाहुणे, सर्व शिक्षक, कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेतील पंधराव्या अध्यायाचे सामूहिक पठण केले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते चंद्रचकोर कारखाने यांनी भगवद्गीतेचे महत्व सांगितले. हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे भगवद्गीता होय. भक्ती मार्गातून शिक्षण घेतल्याने जीवन सार्थक होते.काम, क्रोध,मद,मोह, दंभ ,अहंकार या सहा विकारापासून दूर राहून भक्ती केल्याने परमेश्वर प्राप्ती होत असते.संपूर्ण ब्रम्हांडाचा अभ्यासक्रम म्हणजे भगवद्गीता होय. असे मार्गदर्शन केले.

दुसऱ्या प्रमुख वक्त्या सौ सुरेखाताई भेंडे यांनी भगवद्गीतेतील एक एक अध्याय खूप महत्त्वाचा आहे. भगवद्गीतेतील १८ अध्यायांचे महत्त्व सांगितले.

स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष मधुकर वट्टमवार यांनी सर्व विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेतील श्लोक पाठांतर करावेत. भगवद्गीता आपल्याला जीवन कसे जगावे, हे शिकविते.असे मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय समारोपपर भाषणात शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांनी केले. स्वागत व परिचय श्रीमती निता वट्टमवार यांनी केले.प्रास्ताविक मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी केले.सुत्रसंचलन सौ.भाग्यश्री स्वामी तर, आभार सौ.सविता बोंडगे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

About The Author

error: Content is protected !!