ढोरसांगवी शाळेने दिव्यांगाचा सत्कार करून साजरा केला जागतिक दिव्यांग दिन

ढोरसांगवी शाळेने दिव्यांगाचा सत्कार करून साजरा केला जागतिक दिव्यांग दिन

उदगीर (एल.पी.उगीले) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोरसांगवी येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला .यावेळी गावातील गुंडू नागू वागमारे या दिव्यंगाचा सत्कार करून त्यांच्या गाडीला सजवून मिरवणूक काढण्यात आली,तसेच त्यांच्या कडून त्यांची कहाणी विद्यार्थ्यांना ऐकवली , वागमारे बाबांनी दिव्यांगांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी शासनाकडून अपेक्षा व्यक्त केली. यांनतर विद्यार्थ्यांनी डॉ.हेलन केलर यांच्या जीवनावर छोटे भाषणे केली, तर गंगाधर मुंडे यांनी हेलन केलर यांच्या व इतर यशस्वी झालेल्या दिव्यांगा विषयी सविस्तर माहिती सांगितली. यावेळी मुख्याध्यापक सुरेश गुरमे, ज्ञानोबा टेकले, दत्ता पवार, व नलबले मॅडम आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!