उदयगिरीच्या खेळाडूंची क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे खेळाडू कु.प्रणिता विभुते, कु.पुष्पा सूर्यवंशी (4 X 400 मीटर रिले), श्री. हंसराज ढगे (1500 मीटर धावणे) यांची निवड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या ॲथलेटिक्स संघात झाली आहे. ते दिनांक 3 ते 7 डिसेंबर 2022 या कालावधित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे होणाऱ्या 24 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा.सतीष मुंढे, प्रा.रोहन एनाडले यांनी मार्गदर्शन केले आहे. त्याबद्दल खेळाडूंचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी आणि अॅड प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव डॉ.रामप्रसाद लखोटिया आणि अॅड.सूर्यकांत पाटील, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के यांनी अभिनंदन केले.
