स्वामुक्टा स्थानिक शाखेच्या वतीने प्रा.डॉ.जयप्रकाश पटवारी यांचा सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. जयप्रकाश पटवारी यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड च्या पर्यावरणशास्त्र अभ्यास मंडळावर बिनविरोध निवड झाल्याने स्वामुक्टा स्थानिक शाखेच्या वतीने महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.के.मस्के, स्वामुक्टा स्थानिक शाखेचे अध्यक्ष प्रा.डॉ.एस.जी.पाटील, सचिव प्रा.डॉ.जी.जी.जेवळीकर, कोषाध्यक्ष ग्रंथपाल डॉ.एल.बी.पेन्सलवार व सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
