देवणी येथे बस-स्थानकात अपंग दिनानिमित्त शंकर कांबळे याचा सत्कार.
देवणी (प्रतिनिधी) : जागतिक अपंग दिन दरवर्षी 3 डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तींबाबत सर्वसामान्य जनतेत (समाजामध्ये) जनजागृती निर्माण व्हावी, जेणेकरून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी याची मदत होईल. समाजातील प्रत्येक घटकांनी दिव्यांगांच्या प्रति, सहानुभूती न दाखवता त्यांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे. जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने देवणी शहरातील बस-स्थानकात कार्यरत असलेले शंकर कांबळे यांचा सन्मान सत्कार देवा ग्रुप फाऊंडेशन चे लातूर जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वजनम यांच्या हस्ते करण्यात आला.या सत्कारात सचिन सगर,कलपा भिंगे,रोशन कांबळे,विष्णू माने,अजय कांबळे,अभिजित मसुरे,किरण माने,बंडप्पा होनमाणे(रसवंती ग्रह)विष्णू बिरादार,अजय वाघमारे,समाधान वाघमारे,पवन वजनम, पत्रकार जयेश ढगे, लक्ष्मण रणदिवे आदींची उपस्थिती होती.
