लोणीमोडच्या जि.प.प्रा.शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील लोणीमोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त “हक्क देऊ, संधी देऊ ,दिव्यांगांना प्रोत्साहन देऊ”अशा घोषणा देत, प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी शेख बक्षुद्दिन रसुल साब या दृष्टीहीन गावकऱ्याचा सत्कार करण्यात आला. दिव्यांग दिन व लुईस ब्रेल तसेच अनेक दिव्यांग वैज्ञानिक व त्यांच्या कार्यासंबंधी माहिती सहशिक्षीका सुगंधी भाग्यलक्ष्मी यांनी दिली. यावेळी मुख्याध्यापक संजय वाघमारे यानी दिव्यांग दिना निमीत्त दिव्यांगाना शुभेछा दिल्या. यावेळी पालक, विद्याथीॅ उपस्थित होते.
