उदगीर मध्ये तरुणांचा मनसेमध्ये प्रवेश

उदगीर मध्ये तरुणांचा मनसेमध्ये प्रवेश

उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून लढणारा पक्ष असून समाजातील सर्व स्तरातील समस्या सोडवण्यासाठी मनसे सातत्याने प्रयत्नशील असते, तसेच महाराष्ट्राचे नवनिर्माण घडविण्याची ताकद राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आहे. त्यामुळे राज साहेबांच्या विचारावर तसेच त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उदगीर शहरातील तरुण कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला.

मनसे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष संतोष भोपळे, शहर उपाध्यक्ष लखन पुरी यांच्या नेतृत्वात वाघमारे अलकेश, सुरज बोंद्रे, राजकुमार चव्हाण, सावळे प्रमोद ,शिंदे विशाल, माळगे श्याम, घोगरे संदीप ,नरहरी पांडुरंग ,आचमारे रोहन यांच्यासह त्यांच्या युवा सहकार्याने मनसेमध्ये प्रवेश केला. यावेळी मनविसे शहर सचिव विष्णू अंधारे, दत्ता कारलेवाड हे शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!