तालुक्यातील जलसंधारणाच्या कामासाठी 15 कोटी 3 लाख रूपयांचा निधी मंजूर – आमदार बाबासाहेबजी पाटील
375 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार, शेकडो शेतक-यांना थेट फायदा
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर व चाकूर तालुक्यातील 15 गावात कोल्हापुरी बंधारे व सिमेंट बंधाऱ्यासाठी जलसंधारण विभागामार्फत 15 कोटींचा निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती आमदार बाबासाहेबजी पाटील यांनी दिली.
अहमदपूर तालुक्यातील शिंदगी (बु) 1 कोटी 45 लाख, टाकळगाव कामखेडा 1 कोटी 45 लाख, होटाळा 1कोटी 42 लाख, रोकडा सावरगाव 1 कोटी 43 लाख, हगदळ गुगदळ 1 कोटी 1 कोटी 38 लाख, कोपरा 1कोटी 42 लाख, गोताळा 94 लाख, तांबटसांगवी 1कोटी 26 लाख, खरबवाडी गादेवाडी 97 लाख, थोरलेवाडी 97 लाख, सलगरा 90 लाख तर चाकूर तालुक्यातील वडवळ साठी 1 कोटी 45 लाख असा एकूण पंधरा गावासाठी 15 कोटी 3 लाख 69 हजार 769 रूपयाचा निधी मंजूर झाला असून त्याच्या पुढील प्रक्रिया तात्काळ मंजूर करण्यात येणार आहेत.
तालुक्यातील अधिकाधिक शेती सिंचनाखाली येणे हा मुख्य हेतू असून पडीत जमीनीचा विकास व त्या माध्यमातून रोजगारांची संख्या वाढणार आहे.सिंचनाच्या माध्यमातून ‘विकेल ते पिकेल’ ही संकल्पना तालुक्यातील शेतक-यांसाठी आणणार असून या जलसंधारणाच्या नविन कामातून शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन शेकडो शेतक-यांना आर्थिक सुबत्ता मिळेल.सिंचना सोबत परीसरातील जनावरांचा चारा व पाणी प्रश्न मिटणार आहे असे आमदार बाबासाहेबजी पाटील यांनी सांगितले आहे.