बांधकाम व्यवसायिकास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या गुन्हेगारास Unit-2 ने सापळा रचून केले जेरबंद

बांधकाम व्यवसायिकास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या गुन्हेगारास Unit-2 ने सापळा रचून केले जेरबंद

पुणे : अर्जदार बांधकाम व्यवसायिकास गैरअर्जदार नामे योगेश पारडे रा. मार्केटयार्ड हा त्याचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा वापर करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी उखळत असल्याची तक्रार त्यांनी वरिष्ठांकडे केली होती. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांनी सदर तक्रारी अर्जाची चौकशी व कारवाई करण्याबाबत Unit-2 प्रभारी मा.पो.नि. क्रांतिकुमार पाटील सो. यांना निर्देश दिले होते.

दरम्यान अर्ज चौकशीत गुन्ह्याचा प्रकार स्पष्ट झाल्याने Unit-2 प्रभारी मा.पो.नि. क्रांतिकुमार पाटील सो. यांनी Unit-2 कडील PSI नितीन कांबळे व स्टाफ याना गैरअर्जदार योगेश पारडे रा. मार्केटयार्ड पुणे यास ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने Unit-2 कडील पथक त्याचा शोध घेत असताना PSI नितीन कांबळे व HC संजय जाधव याना तो मार्केटयार्ड गेट न 5 जवळ येणार असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती प्राप्त झाली.

सदरबाबत Unit-2 प्रभारी मा.व.पो.नि. क्रांतिकुमार पाटील सो. याना अवगत करता त्यांनी वरील स्टाफला तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वरील स्टाफने मार्केटयार्ड गेट न 5 याठिकाणी सापळा रचून *योगेश उर्फ सनी आजीनाथ पारडे वय-33 रा. भिमाले कॉम्प्लेक्स, मार्केटयार्ड पुणे यास ताब्यात घेतले. त्याचेकडे सदर तक्रारी अनुषंगाने चौकशी करता तो प्रथम उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर त्यास Unit-2 कार्यालयात आणून त्याचेकडे आणखी कसून चौकशी करता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पो.स्टे. CR No 807/22 IPC 387, 384, 452, 504 या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास पुढील कार्यवाहिकरिता भारती विद्यापीठ पो.स्टे. च्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमीचा
आरोपी नामे योगेश उर्फ सनी आजीनाथ पारडे वय 33 रा मार्केटयार्ड याचेवर यापूर्वी खुनाचा प्रयत्न (02 गुन्हे), गर्दीमारामारी (03 गुन्हे) विनयभंग यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून तो मार्केटयार्ड पो.स्टे. रेकॉर्डवरील सक्रिय गुन्हेगार असल्याचे चौकशीत निष्पन्न आले आहे.

सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री.गजानन टोम्पे, Unit-2 प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री क्रांतिकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली API वैशाली भोसले, PSI राजेश पाटोळे, PSI नितीन कांबळे यांचे दिमतीत पो.अंमलदार. संजय जाधव, उज्वल मोकाशी, उत्तम तारू, विजय पवार, निखिल जाधव, मोहसीन शेख, विनोद चव्हाण या पथकाने केलेली आहे.

About The Author