रेकॉर्ड वरील रिक्षा चोरास चोरीची रिक्षासह ताब्यात घेऊन युनिट 2 ने केले जेर बंद
पुणे (रफिक शेख) : पोलीस उपनिरिक्षक नितीन कांबळे व पोअमं. ८४o९ समिर पटेल. पोअंम.१०७४३ कादीर शेख. पोअंम.६९६६ कोकणे. असे भारती पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना कात्रज चौकात आलो असता पोलीस अंमलदार कादीर शेख, व समीर पटेल यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि . कोंढवा सोमजी चौक खडीमशीन कडे जाणाऱ्या रोडवर एक इसम थांबलेला असुन त्याने अंगात ब्राऊन रंगाचा टि शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली असुन त्याचेकडे रिक्षा असुन ती चोरीची आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बाबत युनिट 2 प्रभारी व युनिट 1 प्रभारी . पो. नि. भोसले युनिट 1( अतिरिक्त कार्यभारी) यांना कळविले असता त्यांनी कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने आम्ही लागलीच आमच्या खाजगी गाडयावरून मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन गुफ्तपणे पाहणी करीत असताना सदर वर्णनाचे कपडे घातलेला इसम हा रिक्षा घेऊन थांबलेला दिसला. सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले आपले नाव जमीर उर्फ गुडडु बकरी कादीर शेख वय ४० वर्ष रा. कोंढवा पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याचेकडे बातमी प्रमाणे रिक्षा नंबर MH-04 JQ 0498 असा असुन रिक्षा मालकाचे नाव सलाउद्दीन जैन उद्दीन अन्सारी रा. भिवंडी ठाणे असे असल्याने मोबाईलवरुन वाहन अॅपद्वारे माहीती प्राप्त झाली. त्यास संपर्क केला असता त्याने दिनांक ०२/११/२०२२ रोजी चोरीस गेली असल्याने मी भिवंडी शहर पोलीस ठाणे येथे गुरनं ४५०/०२२ भादवि ३७९ दिनांक ०३/११/२२ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदर आरोपीने ठाण्यामध्ये दहा ते अकरा रिक्षा चोरलेल्या आहेत असे सांगितले आहे. तरी आरोपीची वैदयकिय तपासणी करून त्याचे सह रिक्षा पुढील कार्यवाही कामी भिवंडी शहर पोलीस स्टेशन ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे. सदरची उल्लेखनिय कामागिरी ही मा. श्री. रामनाथ पोकळे. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हें. मा. श्री. अमोल झेंडे .पोलीस उपायुक्त गुन्हें. मा. श्री. गजानन टोम्पे. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1. मा. श्री. संदीप भोसले. वरिष्ठ पोलीस निरिक्षक युनिट 1 (अतिरिक्त कार्यभार) यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली युनिट 2 चे अधिकारी व अंमलदार या टिमने केली आहे.