पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त २१०० बॉटल रक्त संकलीत करणार
काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांची माहिती
लातूर (प्रतिनिधी) : राज्यात कोविड१९ ची परीस्थिती व सामाजिक बांधिलकी म्हणून राज्याचे वैधकिय मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त २१ मार्च २०२१ रोजी जिल्यातील सर्वच ठिकाणीं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून त्यात २१०० बॉटल रक्तदान करून घेण्याचा संकल्प काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला असून त्यादृष्टीने जिल्यातील सर्वच तालुका, ग्रामपातळीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे त्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी यात मोठा सहभाग नोंदवावा असे आवाहन लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी केले आहे ते जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध सेल चे जिल्हाध्यक्ष ,तालुका अध्यक्ष , प्रमूख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाची बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली बैठकीत त्यानी ही घोषणा केली आहे त्यादृष्टीने जिल्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यानी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
सध्या कोरोना मुळे अनेक उद्योग, व्यवहार ठप्प झाल्याने बाजारात मंदीची लाट असून अनेक आजारी लोकांना रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सामजिक बांधिलकी म्हणून जिल्हा काँग्रेसच्या वतीने राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त २१ मार्च रोजी Kovid १९ चे शासनाचे सर्व नियम पाळून सुरक्षीत अंतर राखून जिल्यातील सर्वच तालुका ग्रामपातळीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून त्यात काँग्रेस तालुका अध्यक्ष, जिल्यातील विविध सेल चे जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते स्थानीक नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा असे आवाहन कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी केले आहे.
यावेळी काँग्रेस भवन येथे आयोजित बैठकीला अभय साळुंके, विजयकुमार पाटील, अँड हेमंत पाटील, कल्याण पाटिल, दत्तोपंत सूर्यवंशी, विलास पाटील, अँड प्रमोद जाधव, सुभाष घोडके, मारोती पांडे, अँड बाबासाहेब गायकवाड, सिराजोद्दिन जहागीरदार, प्रा. एकनाथ पाटील, अँड प्रदिपसिंह गंगने, डॉ उमाकांत जाधव, राम चामे, शरद देशमुख, सौ सुनीता आरळीकर, प्रवीण सूर्यवंशी,डॉ अरविंद भातांब्रे, प्रा. सुधीर पोतदार, सौ सपना किसवे, अँड सुहास बेद्रे, सोनू डगवाले, सहदेव मस्के, प्रवीण पाटील, विकास महाजन, शकील शेख, प्रा. ओमप्रकाश झुरूळे , आदी उपस्थित होते