शिवसेना, युवासेनेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
अतनूर (प्रतिनिधी) : येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या.महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना व युवासेनेच्या वतीने डॉ.बाबासाहेबाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना जळकोट तालुकासंघटक मुक्तेश्वर पाटील, युवासेना जिल्हा चिटणीस तथा महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विकास सोमुसे-पाटील, शिवसेना तालुका संघटक मुक्तेश्वर येवरे, युवासेना तालुका युवा अधिकारी बालाजी यादव, घोणसी विभाग संघटक गोविंद बारसुळे, माधव सोमुसे, सौरभ शिकारे, अरविंद दहिकांबळे, सोमेश्वर गोरखे, किशनराव पाटील, मनोज वाघमारे, संग्राम रेड्डी आदी शिवसैनिक उपस्थित होते. तसेच येथील आंगणवाडी क्रमांक-१ येथे डॉ.बाबासाहेबाच्या प्रतिमेस दलितमित्र बी.जी.शिंदे, कार्यकर्ती चंचला हुगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दलितमित्र, पर्यावरणप्रेमी, पशुपक्षी, प्राणीप्रेमी मित्र तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हासंघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, आंगणवाडी कार्यकर्ती हुगे चंचला शिवाजीराव, आरोग्यसेविका गुंटे सविता रघूनाथ, आशाताई जाधव सविता बाबूराव, मदतनिस नामेवार उषा अशोक, आपात कालिन सुरक्षा दल कमांंडो मनोज चांदेगावकर, अरविंद किंवडे उपस्थित होते.
