श्रीकांत पाटील यांनी राजकारणाला समाजकारणाची जोड दिली – आ. विक्रम काळे

श्रीकांत पाटील यांनी राजकारणाला समाजकारणाची जोड दिली - आ. विक्रम काळे

उदगीर (एल पी उगीले) : उदगीर येथील सहकार महर्षी चंदर अण्णा वैजापूरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते श्रीकांत पाटील यांनी राजकारणाला समाजकारणाची जोड देऊन खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करण्याचा संकल्प केला आहे, हे उल्लेखनीय आहे. असे विचार औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केले. ते उदगीर येथील सहकार महर्षी चंद्रकांत अण्णा वैजापूरे प्रतिष्ठानच्या कार्यालयास सदिच्छा भेट देण्यासाठी आले असता उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

प्रथमतः सहकार महर्षी चंद्रकांत अण्णा वैजापूरे यांच्या हस्ते आमदार विक्रम काळे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार विक्रम काळे यांनी सत्काराला उत्तर देताना, उदगीर शहरांमध्ये होत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव उद्गार काढले. तसेच व्यक्तिशः श्रीकांत पाटील हे सामाजिक जाण ठेवून काम करत असल्याबद्दल त्यांचे कौतुक करून असाच आदर्श इतर युवकांनी घ्यावा, असे सांगितले. श्रीकांत पाटील यांची राजकीय वाटचाल अत्यंत चांगली असून सामाजिक जाणीव जपणाऱ्या कार्यकर्त्यांचे राजकारणात भविष्या असते. असे सांगून शुभेच्छा दिल्या. यानंतर चंद्रकांत अण्णा वैजापूरे प्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात आलेल्या 2023 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षक नेते आर.जी. जाधव, यशवंतराव बिरादार, धोंडीबा बिरादार, मटके सर, विनोद गुरमे, सुनील पाटील, राजकुमार बिराजदार, उद्योजक सुभाष नागठाणे, ज्ञानोबा मुंडे, अजित कांबळे, सय्यद शकील, अजय शेटकर, प्राध्यापक जामकर, विधिज्ञ महेश मळगे, विधिज्ञ बसवराज मुळे, प्राध्यापक तुकाराम शिंदे, शिवाजीराव कोठारे, सुभाष तगाळे, तानाजी जाधव, महेश नवाडे, संतोष सूर्यवंशी, धोंडीबा सुगावकर, सुगावे स्वामी, कल्याण बिरादार, रमेश खंडूमलके, बसवराज पाटील मोघेकर, ज्ञानेश्वर मोरे, विशाल हाळीकर, जय सोनवणे, म्हेत्रे मामा यांच्यासह चंदर अण्णा वैजापूरे प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रतिभा मुळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन चंदर अण्णा वैजापूरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा संयोजक श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले.

About The Author

error: Content is protected !!