जिग्नेश मेवाणी यांनी गड राखला – निवृत्ती सांगवे

जिग्नेश मेवाणी यांनी गड राखला - निवृत्ती सांगवे

उदगीर मध्ये जल्लोष,फटाक्यांची आतिषबाजी!
उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रीय दलित अधिकार मंच आणि राष्ट्रीय काँग्रेस आघाडीचे गुजरात विधानसभेचे उमेदवार आमदार जिग्नेश मेवाणी यांनी संपूर्ण गुजरात मध्ये भारतीय जनता पक्षाची लाट असताना देखील राष्ट्रीय दलित अधिकार मंच ची प्रतिष्ठा सांभाळून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हे त्यांच्या लोकप्रियतेचे आणि दांडग्या जनसंपर्काचेच उदाहरण आहे. असे विचार राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक निवृत्तीराव सांगवे यांनी व्यक्त केले.

ते उदगीर येथील डॉक्टर झाकीर हुसेन चौकात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे संस्थापक अध्यक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांच्या विजयाबद्दल उदगीर शहरात चौका चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या आनंदोत्सवाची सांगता डॉक्टर जाकिर हुसेन चौक येथे करण्यात आली. प्रत्येक चौकात फटाके वाजवून, पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

याप्रसंगी राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुस्मिता माने, बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष संजय कुमार, राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे रवी जवळे, राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रसिद्धी प्रमुख बंटी भाऊ घोरपडे, शेख सोहेल, याकुब शेख, गौस शेख, इलियास शेख, पियू माने, संजय राठोड यांच्यासह राष्ट्रीय दलित अधिकार मंच, एम आय एम आणि बहुजन विकास अभियानचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाच्या या लाटेत आमदार जिग्नेश मेवाणी यांनी ऐतिहासिक विजय मिळवून राष्ट्रीय दलित अधिकार मंचची प्रतिमा उंचावली आहे. असेही विचार निवृत्तीराव सांगवे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहुजन विकास अभियानचे प्रमुख संजय कुमार यांनी केले. सूत्रसंचालन बंटी घोरपडे यांनी तर आभार प्रदर्शन रवी जवळे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!