विकास सोमुसे यांची जिल्हा चिटणीस पदी निवड

विकास सोमुसे यांची जिल्हा चिटणीस पदी निवड

अतनूर (प्रतिनिधी) : येथील महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष विकास गोविंदराव सोमुसे-पाटील यांची शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते युवासेना प्रमुख तथा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे युवासेनेच्या लातूर जिल्हा चिटणीस पदी निवड करण्यात आली. त्याबद्दल शिवसेना, युवासेना, मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, युवासेना जिल्हाप्रमुख, शिवसेना उदगीर तालुकाप्रमुख कैलास पाटील, जळकोट तालुकाप्रमुख मन्मथ धुळशेट्टे, जळकोट तालुकासंघटक मुक्तेश्वर येवरे-पाटील अतनूरकर, युवासेना जळकोट तालुकाअधिकारी बालाजी यादव, शिवसेना व युवासेना घोणसी विभाग संघटक गोविंद बारसुळे, माधव सोमुसे, सौरभ शिकारे, अरविंद दहीकांबळे, सोमेश्वर गोरख, सुदाम बाबर उपस्थित होते. विकास सोमुसे-पाटील हे अतनूर परिसरातील २२ गाव-वाडी-तांडा-वस्तीसह जळकोट तालुक्यात सर्वसामान्य माणसाच्या सुखदु:खात सहभागी होण्यासाठी कायम तत्पर असणारे एक निष्ठावंत कार्यकर्ते तथा बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर कडवे शिवसैनिक कार्यकर्ते भक्त म्हणून त्यांची जळकोट तालुक्यात व अतनूर परिसरात ख्याती आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा त्यांची कुठल्याही पध्दतीचे शोषण होऊ नेय, शासन दरबारी काम अडकुन पडु नेयत म्हणून त्यांची दिवसरात्र धडपड करणारे व्यक्तिमत्व. युवासेना लातूर जिल्हा चिटणीस होणे अत्यंत यथार्थ व सर्वसामान्य माणसाला व शिवसेना, युवासेना पक्षाला, कार्यकत्योंना अधिक बळकटी देणारे आहे. यापुर्वी ते शिवसेना जळकोट तालुकाउपप्रमुख या पदावर अनेक वर्ष ऊत्कृष्ट व चांगल्या प्रकारे पक्ष संघटन वाढीस सिंहाचा वाटा आहे. स्वतः अतनूर-घोणसी पंचायत समिती गणातून उमेदवार म्हणून निवडणूक लढविली आहे.

About The Author

error: Content is protected !!