उदगीरच्या जुळ्या बहिनिंना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर येथील जुळ्या बहिणींना वैद्यकीय शिक्षणासाठी शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे. याबाबत थोडक्यात माहिती अशी की, उदगीर येथील शेख तायफा फिरदोस आणि शेख जमीन जोहरा यांनी नीट परीक्षेत 2022 मध्ये अनुक्रमे 568 आणि 550 गुण घेऊन वैद्यकीय महाविद्यालय (एमबीबीएस) मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतला आहे. दोघींचे प्राथमिक शिक्षण उदगीर येथील अल अमीन प्राथमिक व माध्यमिक विद्यालय उदगीर येथेच पूर्ण झाले आहेत.
त्यानंतर दोघींनी लातूर येथून अकरावी व बारावी तसेच नीटची तयारी करून हे यश संपादन केले आहे. मागील दोन वर्षांमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण कोरोना विषाणूमुळे अडचणीत आले होते. खूप विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान ही झाले, तरी स्वतः आत्मविश्वास वाढवून या दोन्ही बहिणींनी गरुड भरारी घेत यश संपादन केले आहे. तायफा आणि जमीन चे वडील शेख अहमद नूर हे अल अमीन प्राथमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
मुलींच्या यशाचे श्रेय मुलींचे काका शेख मेहमूद नूर व त्या मुलींचे शिक्षक यांना दिले आहे. मुलींना योग्य ते मार्गदर्शन व शैक्षणिक अडचणी न जाणऊ देता काकांनी परिश्रम घेतले. त्यामुळे या यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे सांगितले. तायफा फिरतोस हीचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबाद व शेख जमीन चा डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे यावर्षी एमबीबीएस प्रथम वर्षात प्रवेश झाला आहे. दोन्ही जुळ्या बहिणींच्या या यशाबद्दल अल-आमिनच्या शिक्षण संस्थेचे सचिव शेख महंमद अकबर, डॉक्टर परभणीकर ,संपादक भगीरथ सगर, इरफान हाश्मी, सलीम सर चापोली, अहमद सरवर, मिर्झा पटवेकर, सय्यद महबूब , उस्ताद खलील दुर्राणी, आयुब चौधरी, मलंग जफर ,सय्यद इब्राहिम , हाश्मी इस्माईल, पटेल शफी, हाश्मी बहुउद्दिन, धोंडीराम राठोड, शेख चांद मुसा, सय्यद अली, हाश्मी मिसबहुउद्दिन, सिद्दिकी फसिकउजमा इत्यादींनी अभिनंदन केले आहे.
