लातूर जिल्हा शालेय क्रिकेट स्पर्धा ‘यशवंत ‘ चा संघ अजिंक्य
अहमदपूर (गोविंद काळे) : शालेय क्रीडा स्पर्धा 2022 च्या अंतर्गत क्रीडा संकुल लातूर येथे खेळवल्या गेलेल्या जिल्हा क्रिकेट स्पर्धा, 19 वर्ष वयोगटांमध्ये अहमदपूर येथील यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाने अंतिम सामन्यात उदगीर संघाचा अटीतटीच्या सामन्यात पराभव करीत लातूर जिल्हा अजिंक्यपद पटकावले. नाक आउट पद्धतीने खेळवले गेलेल्या या स्पर्धेमध्ये सुरुवातीच्या सामन्यामध्ये शिरूर अनंतपाळ व देवणी संघाचा यशवंत कनिष्ठ महाविद्यालय अहमदपूर संघाने दणदणीत पराभव करत अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला.अंतिम सामना उदगीर व अहमदपूर यांच्यामध्ये खेळवला गेला अटीतटीच्या या सामन्यात शेवटी यशवंत कनिष्ठ महाविद्यालय अहमदपूर ने उदगीर संघाचा 30 धावांनी पराभव करीत लातूर जिल्हा अजिंक्यपद पटकावले.यासर्व स्पर्धेमध्ये यश माने, दुर्गाप्रसाद चाटे, कृष्णा नागमोडे, संगमेश्वर मजगे, रहमान शेख या खेळाडूंनी दर्जेदार खेळ केला.संघामध्ये अख्तर सय्यद, जुनेद पठाण, संकेत येलमटे, अफान सय्यद, आबेद शेख, अदनान शेख, हातिम सय्यद दिनेश कवडे आधी खेळाडूंचा समावेश होता.या संघास प्रशिक्षक म्हणून क्रीडा शिक्षक संतोष कदम व प्रा अनिल चवळे यांनी मार्गदर्शन केले तर महेश बेंबडे यांनी प्रशिक्षणामध्ये मोलाचे सहकार्य केले.या संघाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोकराव सांगवीकर , सचिव डी. बी. लोहारे सर, प्राचार्य गंपले व्ही. व्ही., उपप्राचार्य गिरिधर घोरबांड सर, पर्यवेक्षक नरडीले यु व्ही , प्रा सय्यद एम यु, प्रा विश्वंभर स्वामी, प्रा शिवशंकर पाटील, प्रा रवी ईरफळे, प्रा रविशंकर पुणे, प्रा सतीश ननीर, क्रीडा शिक्षक हेंगणे सर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी संघाचे अभिनंदन केले आहे.
