आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात कोळपा ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा
लातूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे कोळपा येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आ. रमेशआप्पा कराड यांनी सत्कार करून अभिनंदन केले. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मौजे कोळपा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाकरिता ५ जणांनी तर ७ सदस्यांसाठी २१ जणांनी आपले अर्ज दाखल केले होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गावचे हित डोळ्यासमोर ठेवून सक्षम भाजपाचे पॅनल निवडणूक मैदानात उभे केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारात चर्चा होऊन ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वानुमते निर्णय घेण्यात आला त्यानुसार विरोधी सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि भाजपाच्या पॅनलला अविरोध पाठिंबा दर्शविला.
या निवडणुकीत भाजपा पॅनलचे सरपंचपदाचे उमेदवार सिद्धेश्वर श्रीगिरे आणि सदस्य म्हणून बसवेश्वर खरपडे, शांताबाई चव्हाण, सुनीता झोडपे, चाँदबी पठाण, अंकुश आंबेकर, गोपाळ झोडपे आणि रूपाली खानापुरे यांची बिनविरोध निवड झाली.
कोळपा ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा भाजपाच्या संवाद कार्यालयात गुरुवारी सकाळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ, रमेशआप्पा कराड यांनी सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी गावातील मूलभूत सुविधेबरोबरच गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उन्नतीसाठी प्रयत्न करून गावकऱ्यांनी टाकलेल्या विश्वासास पात्र ठरावे असे आवाहन आ, कराड यांनी केले. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, लातूर तालुका अध्यक्ष बन्सी भिसे, कोळपा येथील भाजपाचे अँड. लिंबराज कातळे, महादेव खानापुरे, पंडित कातळे, सुरपा गायकवाड, जनार्दन मेहकरे, भिवाजी माने, निवृत्ती कातळे, भरत गायकवाड यांच्यासह अनेक जण होते.
