माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी व ग्राहक मेळावा !
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील स्वराज ट्रॅक्टर्स व जाधव बंधू यांच्या वतीने दि. १० डिसेंबर रोजी वार शनिवारी वेळ सकाळी ११.०० वा.स्थळ स्वराज ट्रॅक्टर शोरुम इरफळे कॉम्पलेक्स, वैभव लॉजच्या बाजूस, कॉलेज रोड, अहमदपूर येथे लोकनेते बाळासाहेब जाधव (माजी राज्यमंत्री) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून “शेतकरी मेळावा”, समृध्द शेतीसाठी कृषि प्रक्रीया उद्योग व यांत्रिकीकरणाचे महत्व आणि विविध शासकीय योजनेंची माहिती देण्यासाठी सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन अहमदपूर – चाकुर मतदार संघाचे आमदार तथा चेअरमन सिध्दी शुगर, साखर कारखाना उजना प्रमुख मार्गदर्शक राजेंद्र कदम विभागीय नोडल अधिकारी,विभागीय अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्प लातूर तर प्रमुख अतिथि म्हणुन अविनाश जाधव मॅनेजिंग डायरेक्टर, सिध्दी शुगर, उजना एरिया मॅनेजर स्वराज ट्रॅक्टर्स विलास सागर एरिया मॅनेजर स्वराज ट्रॅक्टर्स चेतन बोडके टेरेटरी मॅनेजर स्वराज ट्रॅक्टर्स चेतन काळे सर्व्हिस मॅनेजर स्वराज ट्रॅक्टर्स यांची उपस्थिती राहणार आहे तरी सदरील कार्यक्रमास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवुन उपस्थिती लावावी अशी विनंती जाधव बंधु रंगनाथ माधव जाधव, माणिक रंगनाथ जाधव कृषी अभियंता माधव रंगनाथ जाधव जि.प. सदस्य, लातूर यांनी केली आहे.
