लालबहादुर शास्त्री विद्यालयात पालक मेळावा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लालबहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात शालांत परिक्षेला सामोरे जाणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा संपन्न झाला.या पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शालेय समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर वट्टमवार उपस्थित होते. तर प्रमुख अतिथीस्थानी संकुलाचे कार्यवाह शंकरराव लासूणे,शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे, पालक प्रतिनिधी डॉ.दीपाली कुलकर्णी ,धनाजी चव्हाण , मुख्याध्यापक बाबूराव आडे ,उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड मंचावर उपस्थित होते.
सरस्वती स्तवनाने व प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.पालक प्रतिनिधी डॉ .दीपाली कुलकर्णी ,धनाजी चव्हाण ,अँड.कपील बिरादार,राजेंन्द्र एकंबेकर यांनी मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापक बाबूराव आडे यांनी दहावी वर्गाचा अभ्यासक्रम ,ज्यादा तासिका,निवडक गुणवंताचा वर्ग ,पालक संपर्क अभियान व सराव परीक्षा नियोजनासंदर्भात सविस्तर माहिती दिली. तसेच पालकांच्या शंकाचे समाधानही केले. प्रमुख अतिथी सतनप्पा हुरदळे पालकांना संबोधित करताना म्हणाले की,”पालकांनी आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी जागृत झाले पाहिजे.तो आदर्श मनुष्य कसा घडेल याकडे लक्ष दिले पाहिजे.
अध्यक्षीय समारोपात मधुकरराव वट्टमवार यांनी पालकांना आपल्या पाल्यासंदर्भात सकारात्मक मानसिकता ठेवावी, व मुलांना परीक्षेचा दबाव न देता बौद्धिक क्षमतेनुसार त्यांचे व्यक्तीमत्व फुलू द्यावे. असे आवाहन केले.या मेळाव्याचे सूत्रसंचालन दहावी प्रमुख कृष्णा मारावार यांनी केले. तर प्रास्ताविक सहप्रमुख रामेश्वर मलशेट्टे यांनी केले. उपस्थित पालकांचे ऋण संतोष गजलवार यांनी मानले. किरण नेमट यांनी शांतीमंत्राने मेळाव्याची सांगता केली.चहापानानंतर पालकांनी विषय शिक्षकांशी संवाद साधला.
