राजर्षी शाहू विद्यालयाच्या विद्यार्थिनी जिल्ह्यात प्रथम, विभागावर निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील मराठा शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित राजर्षी शाहू विद्यालयातील विद्यार्थिनी कु. हर्षला बालाजी राठोड हिने क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत वय वर्षे 17 वयोगटामधून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून शाळेचे, आई-वडिलांचे नावलौकिक केले आहे. या विद्यार्थिनीची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देविदास औटे, सचिव बाबुराव नवटके, मुख्याध्यापक शिवाजी कल्याणे, मार्गदर्शक विषय शिक्षक तथा क्रीडा शिक्षक किशोर डबेटवार,बालाजी चौगुले यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत कर्मचारी ,विद्यार्थी यांनी अभिनंदन केले असून या विद्यार्थिनीचे क्रीडा प्रेमी मित्र परिवारासह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
