उदगीर मतदार संघात विकासाचा डोंगर उभा केला – माजी मंत्री आ. संजय बनसोडे

उदगीर मतदार संघात विकासाचा डोंगर उभा केला - माजी मंत्री आ. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर विधान सभा मतदार संघातील हेर हे गाव जुने असून या गावचा म्हणावा तसा विकास झाला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात पाणीटंचाईची समस्या असल्याचे येथील ग्रामस्थांनी मला वारंवार सांगितले. माझ्या माता भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. त्यांची सोय व्हावी, म्हणून आपण जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याची योजना आणली. या योजनेअंतर्गत हेर गावासाठी पाणीपुरवठ्याच्या कामासाठी जवळपास २ कोटी १५ लाख रुपयाचा निधी मंजूर करून आपल्या गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. जेणेकरून भविष्यकाळात पिण्याच्या पाण्यापासून एकही घर वंचित राहणार नाही. यासाठी माझा प्रयत्न असून मी आमदार झाल्यापासून उदगीर मतदार संघात विकासाचा डोंगर उभा केला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांनी केले.

ते उदगीर तालुक्यातील हेर येथील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी सभापती सोपानराव ढगे, बाळासाहेब मरलापल्ले, हेरचे उपसरपंच तुळशीराम बेंबडे, रामेश्वर बिरादार जकनाळकर, बालाजी गुरुडे, दत्ता माटेकर, अविनाश सुर्यवंशी, राज चौंडे, गंगाधर स्वामी, बक्षु पठाण, बाबासाहेब पाटील, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी पाणीपुरवठा मंत्री आ.संजय बनसोडे यांनी , आपल्या हेर गावात जलजीवन मिशन अंतर्गंत १ कोटी ७५ लक्ष रुपाये मंजूर केले. सदर पाणी पुरवठा योजना ही २ महिन्यात पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

माझ्या मतदार संघातील पाणीटंचाई दुर व्हावी म्हणून जवळपास ६०० कोटी रुपयाची वाटरग्रीड योजना मंजूर केली. मतदार संघातील ग्रामस्थांना भविष्यात पाणीटंचाई भासु नये, म्हणून वाटर ग्रीड योजना आपण आणली आहे. आजपर्यंत ही योजना फक्त महाराष्ट्रात परतुरला होती. मी पाणीपुरवठा मंत्री असताना आपल्या मतदार संघातील जनतेच्या सेवेकरीता ही वाटरग्रीड योजना मंजूर केली होती. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील बारुर येथील धरणातुन आपण पाणी आणणार असुन ही योजना पूर्ण झाल्यास मतदार संघातील एक ही घर पाणीटंचाईपासुन वंचित राहणार नाही. ज्यामध्ये प्रत्येक कुंटुंबाला ५५ लिटर प्रमाणे पाणी देण्याचा आपला मानस आहे. म्हणून भविष्यात कुणालाही पाणीटंचाईच्या झळा पोहोचणार नाहीत, यासाठी आपण काळजी घेत आहोत.

आपल्या हेर गावच्या विकासासाठी मूलभूत सुविधा, योजने अंतर्गत १५ लाख रुपयाच्या वाघोबा मंदिर सभागृह बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन दिला तर २० लाख रुपये मातंग समाजाच्या सभागृह बांधकामासाठी व बौद्ध विहारासाठी १० लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे. अशा विविध योजनेच्या माध्यमातून हेर गावासाठी पाणीपुरवठ्याची योजना सोडून इतर ३ कोटी ४२ लाख रुपयाचा निधी केवळ आपल्या गावाच्या विकासासाठी मी दिला आहे.

मी आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने आमदार झालो आहे. त्यामुळे मी माझ्या आई – वडिलांच्या नंतर केवळ मतदारांना मानतो, म्हणून मी आपला लोकसेवक म्हणून काम करत असल्याचे भावनिक उद्गार आ.बनसोडे यांनी यावेळी काढले.

About The Author

error: Content is protected !!