वाढवण्यात दत्त जयंती निमित्त जंगी कुस्त्या संपन्न

वाढवण्यात दत्त जयंती निमित्त जंगी कुस्त्या संपन्न

हुकूमत शेख (वाढवणा बु) : वाढवणा येथे दर वर्षा प्रमाणे यंदा ही दत्त जयंती निमित्त दत्त प्रासादिक हनुमान समिती तर्फे एक दिवसाची यात्रा व जंगी कुस्त्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कुस्त्याचे उदघाट्न सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. कुस्त्याकारिता अनेक गावाचे मल्ल कुस्ती खेळण्यासाठी उपस्थित होते. मैदानात कुस्त्या पाहण्यासाठी गावातील व परिसरातील असंख्य ग्रामस्थ कुस्त्याचा आनंद घेत होते अनेक कुस्त्या खेळवण्यात आल्या 51रुपये पासुन ते 100,200,500,1000, शेवटची कुस्ती 2500 रुपयाची लावण्यात आली होती. यात्रे निमित्त मिठाई दुकान , खेळण्याचे दुकान, तसेच स्वेटर मफलर, हिवाळी टोप्या, कटलरी, फुगे, प्लास्टिक खेळणी व फराळाची दुकान तसेच अनेक संसार उपयोगी साहित्याचे दुकान थाटले होते. तसेच मनोरंजनाची साधने रेल्वे, आकाशी पाळणे, गोल चक्कर, जपिंग जपांग, ब्रेक डान्स अशी अनेक प्रकारची मनोरंजनाची खेळ आल्याने महिला, पुरुष, तरुण सर्व जण पाळण्यात,रेल्वेत, ब्रेक डान्स, गोल चक्कर मनोरंजनाचा लाभ घेत असताना आनंदी आनंदात दिसत होते. दत्त हनुमान प्रसादिक समितीचे पदाधिकारी नरसिंग डबेटवार, बाबू हळणे, प्रमोद बिरादार, सूर्यकांत हरनाळे यांनी कुस्त्याच्या ठिकाणी जिंकलेल्या मल्लाना बक्षीस देण्याचे नियोजन केले. कुस्ती लागली की नाही पंच म्हणुन अयुब अली हवलदार, सरपंच नागेश थोंटे,संतोष सोमासे,अकबर पहेलवान , श्याम जाधव,उस्मान आवाळे,सईदभाई ड्राइव्हर, संगम अष्टुरे शाकीर गुत्तेदार, गोरे दत्ता, तानाजी सोमासे, हळणे तानाजी,दत्ता बामणे, बालाजी काळे,सलीम तोंडारे, रहीम कासार, इत्यादी अनेक पंच कुस्ती मैदानात मल्लाची कुस्ती लागली का नाही पंच म्हणुन पाहात होते यात्रा व कुस्त्या पाहण्यासाठी हजारो पुरुष उपस्थित होते मनोरंजन व खरेदी साठी असंख्य महिला साहित्य खरेदी करत होत्या कुस्त्या चा व यात्रेचा आनंद घेऊन महिला पुरुष जाताना हातात खाऊ, खेळण्या चे साहित्य दिसत होते यात्रा व कुस्त्या खेळीमेळीच्या वातावरणात शांततेत संपन्न झाल्या.

About The Author

error: Content is protected !!