कै. माणिकराव धनुरे यांच्या पुण्यतिथी निमित्त देवणीत रक्तदान शिबिर संपन्न

कै. माणिकराव धनुरे यांच्या पुण्यतिथी निमित्त देवणीत रक्तदान शिबिर संपन्न

देवणी (लक्ष्मण रणदिवे) : देवणी येथे दर वर्षी शिव बसवेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने कै. माणिकराव धनुरे यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.

याही वर्षी शिवबसवेश्वर सेवाभावी संस्था,देवणी यांनी प्रतिवर्षी प्रमाणे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरा मध्ये शैलेश उमाकांत धनुरे,सय्यद सोहेल फारूख,साजिद सलीम शेख,दत्ता बालाजी चाळकापुरे,कल्याण माणिकराव धनुरे,निलीमा माणिकराव धनुरे,अविनाश सोमनाथ धनुरे,अनिल सिद्राम धनुरे,सुनिल सिद्राम धनुरे,अविनाश माधवराव धनुरे,महादेव पांडूरंग वाघमोडे,रोहीत उमेश पडसलगे,सचिन प्रकाश गडदे,अभिजीत विश्वनाथ सोंदळे यांनी रक्तदान करून कै. माणिकराव धनुरे यांच्या कार्याला उजाळा दिला.

पुण्यतिथी निमित्त या सलग सहाव्या वर्षीच्या रक्तदान शिबिराचे आयोजन शिवबसवेश्वर सेवाभावी संस्था,देवणीचे संस्थापक अध्यक्ष हणमंत माणिकराव धनुरे यांनी केले. व शिबिर आयोजक व रक्तदात्यानंचे कौतुक, आभार नागप्‍पा अंबरखाने ब्लड सेंटर उदगीर चे बी टी ओ डॉ .बसवराज शेटकार यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!