सखा क्रीडा मंडळ च्या खेळाडुंचे विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेस निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर आयोजित जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, लातूर येथे संपन्न झाली. त्या स्पर्धेमध्ये सखा क्रीडा मंडळ, उदगीरच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्या स्पर्धेमध्ये खेळाडू प्राविण्य मिळावले आहे.आता विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेतील विजयी खेळाडू मलकजी मन्हा- प्रथम, सलोनी चौधरी- प्रथम, दिक्षा कांबळे- प्रथम,धम्मदीक्षा कांबळे- प्रथम, गणेश चौधरी- द्वितीय, ऋषीकेश चव्हाण- द्वितीय, या प्रथम क्रमांक मिळवलेल्या खेळाडूंनी आपली विभागस्तरासाठी योग्यता सिद्ध केलेली आहे.
या खेळाडूंना सखा क्रीडा मंडळचे अध्यक्ष – संदीप स. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव – सिकंदर आडे, प्रशिक्षक- झीशान शेख, ऋषीकेश घाटे, महिला प्रशिक्षक- नंदिनी धनुरे, यांनी प्रशिक्षण दिले. या यशाबद्दल जगन्नाथ लकडे जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर, संदीप स. पवार अध्यक्ष तथा राष्ट्रीय पंच, नंदिनी धनुरे- प्रशिक्षक, यांनी अभिनंदन केले. या यशामुळे सर्वच स्तरातून विशेष कौतुक होत आहे.या मिळवलेल्या यशाबद्धल सखा क्रीडा मंडळ च्या वतीने विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले जात आहे.
