शिवरत्न जिवाजी महाले म्हणजे शिवभक्तीचे ज्वलंत उदाहरण – कैलास पाटील
उदगीर (एल.पी.उगीले) : शिवरत्न वीर जीवाजी महाले हे स्वामी निष्ठेचे आणि शिवनिष्ठेचे ज्वलंत उदाहरण आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता आपला स्वामी जगला पाहिजे, हा दूरदृष्टीकोन ठेवून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर होणारा घाव स्वतःच्या अंगावर घेतला. आज अशी स्वामीनिष्ठ नव्या पिढीने जपली पाहिजे. सर्वत्र गद्दारीचे पीक फोफावत आहे, आशासाठी शिवरत्न वीर जिवाजी महाले एक प्रेरणास्थान ठरणार आहेत. असे विचार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )चे तालुकाप्रमुख कैलास पाटील यांनी व्यक्त केले.
ते उदगीर येथील शिवरत्न वीर जिवाजी महाले चौकात फलकाच्या अनावरण प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष देविदास कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे कार्यअध्यक्ष गजानन सताळकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते दिलीप दादा कांबळे, धनाजी बनसोडे, अखिल भारतीय जीवा सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय बिदरकर, तालुकाध्यक्ष कालिदास धोंगडे, तालुका उपाध्यक्ष योगेश जाधव, तालुका सचिव दत्ता श्रीमंगले, तालुका कार्याध्यक्ष गंगाधर आर्य, कोषाध्यक्ष दत्ता शेल्हाळकर, तालुका संघटक राजू नलगीरकर, सल्लागार विष्णुकांत चेरेकर, बापूराव श्रीमंगले, बालाजी सेना, रवी चौधरी, संतोष श्रीमंगले, गोपीनाथ श्रीमंगले, शिवाजी शिंदे, संतोष खिंडेकर, अविनाश सूर्यवंशी, अतुल सूर्यवंशी, केशव आर्य, सचिन चौधरी, बालाजी सेना ,विक्रम आर्य, दयानंद फुलकुर्ते, आर्य सुरज, आकाश शेकापुरे, विशाल शिंदे, संतोष चौधरी, गिरीश माने, वैजनाथ माने, जगन्नाथ श्रीमंगले, मुरलीधर श्रीवास्तव, आदित्य गायकवाड, विशाल होळकर, जय सोनवणे, मनोज सूर्यवंशी, बालाजी आर्य, दत्ता श्रीमंगले, करंजेकर, राजू श्रीमंगले, बंटी चौधरी, गोविंद चौधरी, सदानंद श्रीमंगले, अविनाश शिंदे, रावीकर रमेश इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना कैलास पाटील म्हणाले की, शिवरत्न वीर जीवाजी महाले यांचा आदर्श इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लोक म्हणतात, “होता जीवा म्हणून वाचला शिवा” याचा अर्थ स्वामि निष्ठा जपण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या स्वामींचा जीव वाचला पाहिजे, हा आदर्श त्यांनी दाखवून दिला. ही प्रेरणा भावी पिढीला सतत राहावी यासाठी नांदेड रोडवरील चौकात जिवाजी महाले यांचा फलक लावण्यात आला असून त्याचे अनावरण झाले, असेही घोषित केले. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.
