मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

उदगीर (एल. पी. उगीले) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त जिल्हा अंधत्व निवारण समिती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय द्वारा आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उदगीर विधानसभेचे आमदार तथा माजी गृह राज्यमंत्री संजयजी बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.शिवाजी मुळे हे होते.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजी मुळे, शहराध्यक्ष समीर शेख, कार्याध्यक्ष गजानन सताळकर, जळकोट तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अर्जुन आगलावे, जळकोट रा.काॅ. युवकचे तालुकाध्यक्ष सत्यवान दळवे पाटील, उदगीर युवकचे अध्यक्ष रोहिदास कुंडगीर, उदयगिरी लाॅयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया,प्रा. शाम डावळे, प्रा.महेश बसपुरे, विधानसभा अध्यक्ष प्रा. प्रवीण भोळे, जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार चवळे, डॉक्टर सेलच्या तालुकाध्यक्ष डॉ. सौ.भाग्यश्री घाळे, चंदन पाटील नागरगोजे, जानीमिंय्या सय्यद , माजी नगरसेवक अनिल मुदाळे, शमशुद्दीन जरगर, फैय्याज शेख, शिवकुमार कांबळे,युवक शहराध्यक्ष अजय शेटकर, बसपुरे, विश्वनाथ मुडपे, पाशा शेख, जळकोटचे नगरसेवक तात्या पाटील, शफी हाश्मी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी समाजातील सर्वसामान्य घटकापर्यंत खा.पवार यांचे विचार पोहचविण्याचे काम करुन आपल्या मतदार संघातील 82 गावे अंधमुक्त करण्यासाठी नेत्रशिबीराचे आयोजन करावे. अशा सुचना आ.संजय बनसोडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केल्या. महिलांना सन्मान देण्याचे काम खा. पवारांनी केले. महिलांना ३३ % आरक्षणानंतर ५०% आरक्षण खा.शरद पवारांनी जाहिर केले व महिला न्याय दिला. महिलांनी पुढे येवून पुरूषांच्या खांद्याला खांदा लावुन काम करावे, अशी ईच्छा खा.पवार यांनी व्यक्त केली होती. नामातरांच्या लढ्यात त्यांची भुमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे दलित बांधवांची अस्मिता जपली आहे.खा. शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस सप्ताह साजरा करावा, असे आवाहन आ.बनसोडे यांनी केले.

यावेळी लाॅयन्स नेत्र रूग्णालयाच्या परिसरात नियोजित शरदचंद्र पवार नेत्ररुग्ण धर्मशाळेच्या पहिल्या मजल्याचा शुभारंभ आ.बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला. उदयगिरी लाॅयन्स नेत्र रूग्णालयाच्या परिसरात खा.शरदचंद्र पवार धर्मशाळेचे बांधकाम होत असुन यासाठी पूर्वी ५० लाखाचा निधी दिला होता, आता आमदार फंडातुन 25 लाखाचा निधी देण्याचे आ.बनसोडे यांनी जाहीर केले. या शिबिरात ३०० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्तविक डाॅ.रामप्रसाद लखोटीया यांनी केले. सुत्रसंचालन व आभार डाॅ.भाग्यश्री घाळे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!