देवणी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांचे सत्कार व निरोप

देवणी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांचे सत्कार व निरोप

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांचे नुकतेच पन्हाळा ( जिल्हा कोल्हापूर) नगरपरिषद येथे बदली झाल्याने त्यांना देवणी नगरपंचायतीच्या वतीने सत्कार करून निरोप देण्यात आले.

देवणी नगरपंचायतीत प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असलेले चेतनकुमार माळी यांना नगरपंचायतीच्या वतीने त्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी देवणी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा डॉ. कीर्तीताई घोरपडे ,उपनगराध्यक्ष अमित मानकरी, नगरसेवक डॉ. अनिल इंगोले, महादेव मळभगे, ,योगेश ढगे, बाबुराव लांडगे, डॉ. संजय घोरपडे, पत्रकार रमेश कोतवाल, प्रा. रेवण मळभगे, जाफर मोमीन, श्रीपाद कुलकर्णी, बालाजी कारले, कु. आम्रपाली कंधारे ,अभियंता पठाण, योगेश शिवगे ,सुजात सय्यद , यादव लोकरे, अमोल शिंदे, रवी कांबळे , नामदेव टाळीकोटे, पिंटू कांबळे ,विद्यासागर शिंदे, अभिलाष पतंगे आदी सह नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!