लोकनेते स्व.गोपीनाथ मुंढे यांच्या जयंतीनिमित्त कुमठा रक्तदान शिबिर संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : लोकनेते स्व.गोपीनाथ मुंढे यांच्या जयंती निमित्त गोपीनाथ मुंढे विचार मंच कुमठा यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार गोविंदराव केंद्रे व उद्घाटक म्हणून उदगीर राष्ट्रीय स्वंसेवक संघ तालुका कार्यवाह परमानंदजी रमेशराव निलंगे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ स्वयं सेवक प्रमोदजी कुलकर्णी, स्वयं सेवक सतीश पाटील,डॉ. ओमप्रकाश कल्याणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराचे पाहिले रक्तदाते म्हणून माजी आमदार गोविंद केंद्रे हे पुढे येत आपल्या आयुष्यातील 72 वे रक्तदान करत गावातील तरुणांना विचारानेच नव्हे तर आचरणाने प्रेरणा देत हे रक्तदान आपले मित्र लोकनेते गोपीनाथ मुंढे यांना समर्पित केले.
या रक्तदान शिबिरात गोविंद फड,गोविंद केंद्रे,अत्तार रब्बानी,माधव भूसारे,पवन तिकटे,इस्माईल तांबोळी,नामदेव डीगोळे,बालाजी डीगोळे,आनंद साबणे,गौसोद्दिन शेख,वसंत राठोड,कालिदास घुगे,लक्ष्मण केंद्रे, सुशेन फड,धर्मवीर जाधव,संभाजी फड,नदीम सय्यद,अमरकुमार ख्याडे,आकाश केंद्रे,उद्धव डीगोळे,अंगद घुगे,किशोर जाधव, महेश केंद्रे,पवन भुसारे,शुभम केंद्रे,सुशील केंद्रे, नरसिंग ऐनीले,आसिफ तांबोळी,शिवराज पटणे,बालाजी गदगे,अमर बंदगे,शंकर बिरादार,तुकाराम फड,इर्शाद सय्यद,पंकज केंद्रे, आसिफ बागवान,कृष्णा केंद्रे,गोविंद घुगे,बालाजी जाधव,रोहित केंद्रे,पांडुरंग घुगे,चंद्रकांत जाधव,परमेश्वर कारभारी,हणमंत मंचवाडे,वैजिनाथ बिरादार,संतोष केंद्रे,विजयकुमार फड,बालाजी कारभारी,कल्याण केंद्रे,डॉ.मजुमदार बाबुल,विजय पटणे,सतीश केंद्रे,संदीप केंद्रे,अर्जुन फड यांनी रक्तदान करत विनम्र अभिवादन केले. या शिबिराचे आयोजन गोपीनाथ मुंढे विचार मंचच्या वतीने सतीश केंद्रे यांनी केले होते.
या शिबिरासाठी सोमनाथ कारभारी,तुकाराम डीगोळे,ज्ञानेश्वर केंद्रे,राजकुमार पवार,प्रकाश बिरादार,शिवाजी केंद्रे,राम मोमले,बाळराजे पवार,संभाजी फड यांनी विशेष परिश्रम घेतले. नागप्पा अंबेरखाने ब्लड सेंटर उदगीर च्या वतीने पी आर ओ ओमकार गांजुरे यांनी शिबिर आयोजकांचे व रक्तदान करणाऱ्या सर्व तरुणांचे आभार व्यक्त केले.
